Viral video : अरेरे ! नवरा सापडला प्रेयसीसोबत; पत्नीने पाहिलं अन्…

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडिओ धक्कादायक वा काही आश्चर्यचकित करणारे असतात. आता असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जिथे नवरा त्याच्या प्रेयसीसोबत असल्याचे पाहून पत्नीने रस्त्याच्या मधोमध पतीला बेदम मारहाण केली.

बऱ्याचदा चित्रपटसृष्टीतील दृश्ये खऱ्या आयुष्यातही पाहता येतात. पण ते किती धोकादायक असू शकते हे या व्हिडिओवरून सिद्ध होते.

चित्रपटसृष्टीत विवाहबाह्य संबंधांसारखे प्रश्न सामान्य वाटतात, पण प्रत्यक्षात ते तितकेसे सामान्य नाहीत. यासंबंधीचा हा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, विवाहबाह्य संबंधांमुळे एका महिलेने तिच्या पतीला रस्त्याच्या मधोमध मारहाण केली.

पत्नीने तिच्या पतीला रस्त्याच्या मधोमध त्याच्या प्रेयसीसोबत पाहिले होते. मग रागाच्या भरात ती तिथे पोहोचली आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की पत्नी पतीला ओरडत आहे आणि शिव्या देत आहे. त्यानंतर ती त्याला मारहाण करू लागते. ‘घर का कलेश’ नावाच्या ट्विटर हँडलवरून ते सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.

टीप : सोशल मीडियावर विवाहबाह्य संबंधांमुळे एका महिलेने तिच्या पतीला रस्त्याच्या मधोमध मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र याची पडताळणी अद्याप झालेली नाही. ही माहिती फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी दिली आहे. आम्ही याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.