केटामाईनचे इंजेक्शन देवून पत्नी – मुलीचा खून दुहेरी खटल्यात पतीला आजन्म सश्रम कारावास

जळगाव : चारित्र्याचा संशय घेत पत्नी तसेच अल्पवयीन मुलीला केटामाईनचे इंजेक्शन देवून खून केला होता. या गुन्ह्याच्या खटल्यातील संशयित सचिन गुमानसिंग जाधव याला न्यायालयाने आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

सचिन जाधव हा घटनेच्या १६ वर्षापूर्वी रिंगरोडवरील हॉस्पीटलमध्ये कंपाउंडर म्हणून कार्यरत होता. त्याचा विवाह झाल्यापासून तो हॉस्पीटलमध्ये दुसऱ्या मजल्यावर पत्नी कविता, मुलगी रिनाक्षी यांच्यासह राहत होता. कविता ही एका कंपनीचे सौदर्य प्रसाधने विक्री करण्याचे काम करीत होती. रिनाक्षी ही इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होती. पती सचिन हा त्याची पत्नी कविता हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. मनात व्देषभावना मनात ठेवून त्याने ५ मे च्या मध्यरात्री कविता व रिनाक्षी या गाढ झोपेत असताना दोघांना विषारी औषध इंजेक्शनव्दारे देवून जीवे ठार मारले. या प्रकरणी तुषार राजपूत यांच्या तक्रारीनुसार ६ मे २०१६ रोजी पती सचिन जाधव, सासु, सासरे जेठ व जेठाणी यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासी अधिकारी सुप्रिया देशमुख, पोलीस निरीक्षक शाम तडवाडकर, कुबेर चवरे यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या खटल्यात आरोपीविरूध्द भादवी कलम ३०२,२०१, ४९८ अ सह कलम३४ प्रमाणे दोषारोप ठेवण्यात आला. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणीचे कामकाज चालले.

मारले. या प्रकरणी तुषार राजपूत यांच्या तक्रारीनुसार ६ मे २०१६ रोजी पती सचिन जाधव, सासु, सासरे जेठ व जेठाणी यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासी अधिकारी सुप्रिया देशमुख, पोलीस निरीक्षक शाम तडवाडकर, कुबेर चवरे यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या खटल्यात आरोपीविरूध्द भादवी कलम ३०२,२०१, ४९८ अ सह कलम३४

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने परिस्थितीजन्य पुराव्यावर सरकार पक्षाने जोर दिला. यात एकूण २४ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यात फिर्यादी तुषार राजपूत, डॉ. पाठक, हॉस्पिटलचे डॉक्टर, मेमोरंडम पंच, केटामाईन बॉटल जप्ती पंच इत्यादी साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

एकुण १२ परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यात घटनेच्या वेळी व घटनेच्यापूर्वी संशयित आरोपी हा रिंगरोड येथील हॉस्पिटलमध्ये रहात होता. पत्नी व मुलगी यांचा मृत्यू हा खून आहे. संशयिताचा या दोघांना खून करण्याचा उद्देश होता. सचिन हा कंपाउंडर असल्याने त्याला औषधांचे, केटामाईन विषारी औषधाचा तसेच इंजेक्शन देण्याची संपूर्ण माहिती होती. घटनेच्या दिवशी संशयित हा घरात हजर होता. खून करुन तो मध्यरात्रीनंतर फरार झाला होता. यासंदर्भात त्याने कुठलेही स्पष्टीकरण पोलिसांनी दिले नव्हते. केटामाईनचे विषारी इंजेक्शन त्याने स्मशान भुमीजवळील नाल्यात फेकुन दिले होते. हॉस्पिटलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन संशयित हा घटनेप्रसंगी हजर होता, हे शाबित झाले. या बाबी सरकार पक्षाने प्रभावीपणे मांडल्या.

अशी सुनावली शिक्षा

सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तीवाद, परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेत जिल्हा सत्र न्यायालयाने सचिन जाधव याला दोषी धरले. भादंवि कलम ३०२ अन्वये त्याला आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, भादवी कलम २०१ नुसार एक वर्ष सश्रम कारावास तसेच एक हजार दंड, दंड न भरल्यास एक महिन्यांची साधी कैद अन्य चार संशयिताना न्यायालयाने दोषमुक्त केले. सरकार पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता नीलेश चौधरी यांनी प्रभावी बाजू मांडली.