हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र अधिक शक्तिशाली, स्क्रॅमजेट इंजिनची चाचणी यशस्वी

---Advertisement---

 

नवी दिल्ली : हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राला अधिक शक्तिशाली करणाऱ्या स्क्रमजेट इंजिनची चाचणी यशस्वी झाली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात् डीआरडीओने इंजिनची निर्मिती केली. अत्याधुनिक इंजिनच्या यशस्वी चाचणीमुळे ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पट वेगाने मारा करण्यात हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रे सक्षम असेल.

संरक्षण विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, डीआरडीओ हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या स्क्रॅमजेट इंजिनची घेतलेली चाचणी यशस्वी झाली. यामुळे हायपरसोनिक क्षेपणास्त्रे ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पट वेगाने मारा करण्यास सक्षम असतील. हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या विकासात हा महत्त्वाचा आहे.

ही चाचणी २५ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या अल्प कालावधीच्या चाचणीवर आधारित असून, यावेळी इंजिनमध्ये काही बदल करून दीर्घ कालावधीची चाचणी घेण्यात आली. या यशस्वी चाचणीने भारताच्या संरक्षण क्षमतेला बळकटी मिळणार आहे. हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र एका तासात ६,१०० किमी वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे. हा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पटीने जास्त आहे. उल्लेखनीय कामगिरी अत्याधुनिक एअर ब्रेथिंग इंजिनद्वारे साध्य झाली.

क्षेपणास्त्रांच्या विकासात अभूतपूर्व टप्पा: राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दीर्घ कालावधीच्या स्क्रॅमजेट इंजिनच्या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ. उद्योग भागीदार आणि शैक्षणिक संस्थांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले, की ही कामगिरी देशाच्या हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमासाठी एक भक्कम पाया रचते. हैदराबादस्थित डीआरडीओ प्रयोगशाळेने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या विकासात एक अभूतपूर्व टप्पा गाठला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---