---Advertisement---

Nicholas Aujula : 2025 मध्ये काय होणार ? प्रसिद्ध भविष्यवेत्त्याची धक्कादायक भविष्यवाणी !

---Advertisement---

Hypnotherapist Nicholas Aujula : संपूर्ण जगाने नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले आहे. मात्र, 2025 मध्ये जगासाठी अनेक मोठ्या संकटांची शक्यता वर्तवली जात आहे. प्रसिद्ध हिप्नोथेरेपिस्ट निकोलस ऑजुला यांनी 2025 वर्षाच्या भयानक घडामोडींची भविष्यवाणी केली आहे, ज्यामध्ये तिसऱ्या महायुद्धाचा उल्लेख आहे.

निकोलस ऑजुला यांचे भविष्यभान


निकोलस ऑजुला हे लंडनमधील 38 वर्षीय हिप्नोथेरेपिस्ट आहेत. त्यांनी 2018 साली कोरोना महामारीबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती. आता 2025 साठी त्यांनी धक्कादायक भाकीत केले आहे.

त्यानुसार : तिसरे महायुद्ध: धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावावर जगभर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होईल. राजकीय नेत्यांच्या हत्या होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील बदल: ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची सत्ता जाईल. प्रिन्स विलियम आणि हॅरी यांच्यातील समझोता: दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा निघेल.

 

विज्ञान आणि पर्यावरणातील महत्त्वाचे बदल

कृत्रिम अवयवांची निर्मिती: 2025 मध्ये प्रयोगशाळेत कृत्रिम अवयव तयार करण्याचा प्रकल्प यशस्वी होणार आहे.
महापूर आणि वाढता जलस्तर: समुद्राचा जलस्तर वेगाने वाढून अनेक शहरे पाण्याखाली जातील.
महागाईचा उच्चांक: वर्षभरात आर्थिक संकट तीव्र होईल.

भविष्यवाणीचा स्रोत

निकोलस यांनी सांगितले की, ते 17 व्या वर्षी कोमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या स्वप्नांद्वारे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य समजले. त्यांच्या म्हणण्यानुसार आत्मा कधीच मरत नाही, त्यामुळे भविष्यकथन हे त्यांच्या आध्यात्मिक क्षमतेचे फळ आहे.

भूतकाळातील सत्य ठरलेल्या भविष्यवाणी

ब्लॅक लाइव्स मॅटर आंदोलन
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोट आर्मीचा उदय
कोरोना महामारीचा उद्रेक

2025 कसे असेल, याबाबत जगभरात कुतूहल असून निकोलस ऑजुला यांच्या भाकितांमुळे लोकांमध्ये चिंतेची भावना निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment