भारतीय शेअर बाजारातील मोटर्स इंडिया या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. ह्युंदाई मोटर्स इंडिया या कंपनीचा आयपीओ आज भारतीय शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला. १ ९ ६ ० रुपये इश्यू प्राईस असलेला हा शेअर सूचिबद्ध होताच १ ९ ३ १ या किमतीवर व्यवहार करू लागलं. तगड्या रिटर्न्सची अपेक्षा असणाऱ्या या शेअरने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे.
आयपीओ आला तेव्हा या कंपनीच्या एका शेअरची इश्यू प्राईज 1960 रुपये ठरवण्यात आली होती. मात्र शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला तेव्हा या शेअरचे मूल्य 1,931 रुपये होते. म्हणजेच इश्यू प्राईजपेक्षा हा शेअर 1.48 टक्क्यांनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला. एनएसईवरही हा शेअर इश्यू प्राईजच्या तुलनेत 1.33 कमी टक्क्यांनी सूचिबद् झाला.
ह्युंदाई मोटर्सचा शेअर सूचिब्ध झाल्यानंतर 10.30 वाजता त्याचे मूल्य 4.80 रुपयांनी घसरून 1,865 रुपयांपर्यंत पोहोचले होते. ह्युंदाईचा आयपीओ आला तेव्हा एका लॉटसाठी गुंतवणूकदारांनी 13,720 रुपये मोजले होते. एका लॉटमध्ये कंपनीने गुंतवणूकदारांना सात शेअर्स दिले होते. शेअर बाजारावर सूचिबद्ध झाल्यानंतर या शेअरमध्ये साधारण 95 रुपयांची घट पाहायला मिळाली. म्हणजेच गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये साधारण 665 रुपयांचा तोटा झाला.
भारतीय बाजारातील सर्वांत मोठा आयपीओ
ह्युंदाई मोटर्सचा हा आयपीओ भारतीय शेअर बाजारातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ होता. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 15 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. हा आयपीओ एकूण 27,870.16 कोटी रुपयांचा होता. याआधी एलआयसीचा आयपीओ सर्वांत मोठा होता.