Dilip Khodpe Vs Girish Mahajan । लोकांचं प्रचंड प्रेम, रेकॉर्ड ब्रेक मतं मला मिळणार; कुणी व्यक्त केला विश्वास ?

Dilip Khodpe Vs Girish Mahajan । भाजपातर्फे मंत्री गिरीश महाजन यांना सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शरदचंद्र पवार पक्षांकडून दिलीप खोडपे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार दिलीप खोडपे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन ?
जामनेर विधानसभा मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांना सातव्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. सातव्यांदा उमेदवारी दिल्यामुळे लोकांचा प्रचंड प्रेम मिळत असून यावेळी महाराष्ट्रात सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक मते मला मिळतील, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तरुणांचा आणि जनतेचा उत्साह पाहून विरोधक या मतदारसंघात कुठे दिसणार नाही. या मतदारसंघात रस्त्याची काम संपूर्ण झाली आहेत मात्र, काही सिंचनाची काम बाकी आहेत. येणाऱ्या पाच वर्षात निश्चित हे काम पूर्ण केले जातील. कारण सत्ता ही महायुतीची येणार आहे, असा विश्वास व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्या विरोधात त्यांना उमेदवार आयात करावा लागला, अशी टीका देखील केली आहे.

काय म्हणाले दिलीप खोडपे ?
गिरीश महाजन यांना सातव्यांदा उमेदवारी जाहीर होणारच होती. हे गृहीत धरून आम्ही तयारीला लागलो होतो. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचे विशेष नवल वाटलं नाही. कारण त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण मला अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नाही तरीही मला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

तुम्ही जर म्हणत असतील की आमचा पक्षाचा माणूस /उमेदवार पळवला तर तुमच्या पक्षाने विरोधी पक्षातले मोठे मोठे नेते पळवले त्याचं काय ? आपण म्हणतो जैसी करणी वैसी भरनी… त्याप्रमाणे आता मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो आहे. घोडा मैदान समोर आहे. मागच्यावेळी सुद्धा ते सांगत होते की मी एक लाखाच्या मताधिक्याने तसेच सर्वात जास्त मतांनी निवडून येईल… मात्र काय झालं ? तुम्ही प्रत्यक्ष बघितल असेल काय झालं असं म्हणत दिलीप खोडपे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.