जास्त गोड खात असाल तर ‘ही’ बातमी वाचाच

तरुण भारत लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । काही लोकांना गोड़ खायला खूप आवडत असत.  पण तुम्हला माहित आहे का? जास्त गोड खाल्ल्याने तुम्हाला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. गोडाचे सेवन योग्य प्रमाणात केले तर त्याचा शरीराला फायदा होतो. म्हणून डॉक्टर नेहमी कमी गोड खाण्याचा सल्ला देतात. आज आपण जाणून घेणार आहोत की  खूप गोड खाल्ल्याने आपल्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

रोज गोड खाल्ल्याने वजन किंवा लठ्ठपणा हा वाढू शकतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात गोड खाल्याने तुमचे लक्ष विचलित होऊन तुम्ही कोणत्याच गोष्टीत लक्ष केंद्रित करू शकत नाही. तसेच जास्त गोड खाल्याने तुम्हाला मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो.रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. म्हणजे व्यायामाचा अभाव, आहारात साखरेचे प्रमाण जास्त असणे यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

जास्त गोड खाल्यामुळे दातांना कीड लागते आणि दात खराब होतात. आहारात साखर जास्त असेल तर आळशीपणा वाढतो.जर का तुम्ही डार्क चॉकलेटसारख्या काही गोड गोष्टी खात असणार तर स्ट्रोकचा धोका कमी होतो आणि उच्च रक्तदाब म्हणजेच उच्च बीपीमध्येही फायदा होतो. साखर जास्त प्रमाणात खाल्याने वजन वाढते. जास्त गोड़ खाणाऱ्यांना हृदयविकाराचा धोकाही निर्माण होतो. या सगळ्या समस्या जर तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्ही जास्त गोड़ खाणे टाळले पाहिजे.