---Advertisement---

गांजा बाळगने ‘IIT बाबा’ला भोवले; पोलिसांनी घेतले ताब्यात

by team
---Advertisement---

आपल्या अनेक विधानांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या आणि महाकुंभमेळ्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला अभय सिंग उर्फ IIT बाबा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळस चर्चेचा विषय वेगळा असून गांजा बाळगल्या प्रकरणी IIT बाबाच्या अडचणीत वाढ झाली असून त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

अभय सिंग उर्फ IIT बाबाकडून गांजा ताब्यात घेण्यात आला आहे. जयपूरमधून त्याला ताब्यात घेतलं पोलिसांकडून अभय सिंहची चौकशी सुरू आहे. जयपूरमधील रिद्धी सिद्धी पार्क क्लासिक हॉटेलमधून अभय सिंहला सोमवारी ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर गांजा बाळगल्याप्रकरणी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अभय सिंग हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईचा पदवीधर आहे. महाकुंभमेळ्यात तो “आयआयटी बाबा” म्हणून लोकप्रिय झाला.

हेही वाचा : …पण मला जिवंत ठेव दादा; स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडितेचा पोलिसांत जबाब

दरम्यान, आत IIT बाबाच्या अडचणीत वाढ झाली आहे जयपूरमधील रिद्धी सिद्धी परिसरातील एका हॉटेलमध्ये राहून गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेत अभय सिंगला ताब्यात घेतले यावेळी त्याच्याकडून गांजा जप्त केला. चौकशीदरम्यान त्‍याने दावा केला की, “तो अघोरी बाबा आहे. प्रथेनुसार गांजाचे सेवन करतो.”

अभय सिंहकडे गांजा आढळल्यानंतर त्याने सांगितलं, की हा महादेवाचा प्रसाद आहे. सर्व बाबा पितात. पोलिसांनी अभय सिंहशी बोलताना त्याला हे बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. त्यावर त्याने सांगितलं, की सर्व साधू खुलेपणाने पीत आहेत. सर्वांसमोर पुरावा आहे. या सर्वांनाही पकडा असे त्याने पोलिसांना म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment