जळगाव मनपा कर्मचारी सातवा वेतन आयोगाच्या पहिल्या टप्य्यापासून वंचित

जळगाव : देशात आठवा वेतन आयोग लागू करण्याची चर्चा सुरु असतांना जळगाव मनपा कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या पहिला टप्प्यापासून वंचित आहेत. त्यांना लवकरात लवकर सातव्या वेतन आयोगाचा पहिला टप्पा देण्यात यावा अशी मागणी महानगरपालिकेतील सर्व सफाई कर्मचारी व मनपा कर्मचारी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडी अडचणी यावर चर्चा करण्यात आली. तसेच  20 मार्च रोजी राज्य शासनाने  शासन परिपत्रक निर्गमित केले आहे.  सातवा वेतन आयोगाचे फरक पाच सामान हप्त्यात वितरित करण्यात यावेत असे आदेशित करण्यात आले आहे. परंतु, जळगाव महानगरपालिकाने आजपर्यंत सातव्या वेतन आयोगाचा एकही टप्पा दिलेला नाही. सातवा वेतन आयोगाची सर्व फरकाची टप्प्याची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.  बैठक अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. नाशिक महापालिकेने सातव्या वेतन आयोगाचे तीन टप्प्यांचे वितरण केले आहे. मात्र, जळगाव महापालिकेतील कर्मचाऱ्यांना अद्याप पहिला टप्पा मिळाला नसल्याची माहिती यावेळी अजय  घेंगट यांनी दिली. याबाबत मनपा कर्मचाऱ्यांची लवकरच बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतर या सातवा वेतन आयोग जळगाव महापालिका कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लागू करावंक असे निवेदन आयुक्तांना देण्यात येणार असल्याचे अजय घेंगट  यांनी ‘तरुण भारत लाईव्ह’ बोलतांना सांगितले.