कोलकाता : पश्चिम बंगालमधून हिंसाचाराचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, टीएमसी (तृणमूल काँग्रेस) च्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्यांवर हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर ममतांच्या कारभारावर विरोधकांनी टीका सुरू केली आहे.
पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भोंगळ कारभारचे प्रदर्शन हा व्हिडिओ आहे. व्हिडीओमध्ये एक महिला आणि पुरुषाला रस्त्यावर जमावामध्ये मारहाण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. ताजेमुल असे आरोपीचे नाव असून स्थानिक लोक त्याला जेसीबी म्हणून ओळखतात. ‘त्वरित न्याय’ देण्यासाठी त्यांची ख्याती आहे, त्यांच्या नजरेत पोलिस न्यायालयाला कोणताही दर्जा नाही. अमित मालवीय यांनी ते चोप्राचे आमदार हमीदुर रहमान यांच्या जवळचे असल्याचे सांगितले आहे.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, “टीएमसीद्वारे चालवल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमधील शरिया न्यायालयांच्या वास्तवाची भारताने जाणीव ठेवली पाहिजे. प्रत्येक गावात संदेश असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महिलांसाठी शाप आहेत. पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मागमूसही नाही. ममता बॅनर्जी या राक्षसाविरुद्ध कारवाई करतील की शेख शाहजहानच्या बाजूने उभ्या राहिल्याप्रमाणे त्याचा बचाव करतील? संदेशखळी येथील आदिवासी समाजातील महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शेख शाहजहान आणि त्याच्या साथीदारांना वाचवण्यासाठी बंगाल सरकारने रात्रंदिवस काम केले.
ही घटना पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूरच्या चोप्रा येथील लक्ष्मीकांतपूर येथील असल्याची माहिती आहे. याबाबत ‘राष्ट्रीय महिला आयोग’ (NCW) लाही माहिती देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये ‘कांगारू कोर्ट’ चालवणाऱ्या इस्लामिक कट्टरपंथीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना आजही पक्ष कार्यालयात कुटुंबासह राहावे लागत आहे. गावे, गावे रिकामी झाली आहेत.