सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची महत्वाची माहिती

#image_title

मुंबई : उच्च न्यायालयाने शुक्रवारी बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार केल्याच्या हायप्रोफाइल प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी मोठी माहिती दिली आहे.

14 एप्रिल रोजी सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळ झालेल्या हल्ल्यातील आरोपी अनुज थापन याने 1 मे रोजी आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह गुन्हे शाखेच्या लॉकअपच्या शौचालयात सापडला होता, त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला होता. थापनची आई रीटा देवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआयकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती.

6 डिसेंबर शुक्रवारी दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या तपासाच्या अहवालाचा हवाला देत अनुज थापनचा मृत्यू मारहाणीमुळे झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. न्यालयाने म्हटले की, या खटल्यातील मुख्य आरोपी नसलेल्या १८ वर्षांच्या मुलाला का मारलं असेल ?अहवालात दिलेल्या निष्कर्षांवरून असे समजू शकते की, सीसीटीव्ही फुटेजनुसार, अनुज एकटाच बाथरूममध्ये गेला, तिथे उपस्थित असलेली बादली उलटी केली, त्यावर उभा राहिला आणि नंतर गळफास लावून घेतला. शिवाय, तो स्वत: शूटर नव्हता, असं स्पष्टीकरण कोर्टाकडून देण्यात आलं आहे.

न्यायालयाने थापनच्या आईबद्दल सहानुभूती व्यक्त केली, परंतु आत्महत्येच्या वैयक्तिक हेतूंशी संबंधित गुंतागुंतांवर भर दिला. “कोणत्याही व्यक्तीची मानसिक स्थिती पूर्णपणे समजून घेणे आव्हानात्मक असते आणि दुर्दैवाने, त्यामुळेच अनेकदा आत्महत्या खूप गोंधळात टाकणाऱ्या आणि दुःखद असतात,” न्यायमूर्ती डेरे म्हटलं आहे.

दरम्यान अजूनही लॉरेन्स बिष्णोईकडून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. सध्या त्याच्या सुरक्षतेतही वाढ करण्यात आली आहे. सलमान खान सध्या बिग बॉस 18चं सूत्रसंचालन करत आहे.