जळगाव : आगामी महापालिका निवडणुकीचा पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्व पश्चिम व महानगराची संघटनात्मक महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी (२३मे ) वाजता पार पडली. ही बैठक भाजप कार्यालय जी. एम. फाउंडेशन येथे निवडणूक निरीक्षक प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी आगामी कार्यक्रमाविषयी कार्यकर्त्यांना विस्तृत स्वरूपात माहिती दिली.
याप्रसंगी प्रदीप पेशकार यांनी मार्गदर्शनात सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात राबवायचा आहे. जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. जळगाव जिल्ह्याने पक्षाला मोठे योगदान दिले असून हे फक्त कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक शक्ती मजबूत असल्यानेच शक्य झाले आहे. संघटनात्मक तिन्ही जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रसंगी नूतन जिल्हाध्यक्षांचा सत्कार आ. सुरेश भोळे व प्रदीप पेशकार त्यांच्या हस्ते करण्यात आला.
मावळते जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे , महिला आघाडी उपाध्यक्ष रेखा वर्मा, नंदू महाजन , सुरेश धनके, माजी आ. महेंद्र पाटील, महिला अध्यक्षा भारती सोनवणे , सरचिटणीस महेश जोशी, जितेंद्र मराठे, सचिन पानपाटील , लालचंद पाटील , मधुकर काटे, विशाल त्रिपाठी याच्या सह जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते हे बैठकीस उपस्थित हो.ते. नितीन इंगळे यांनी सूत्रसंचलन तर राहुल वाघ यांनी आभार मानले.