भारतावर टॅरिफ लादणे मूर्खपणाचे, अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी ट्रम्प यांना सुनावले

---Advertisement---

 

भारतावर आयात शुल्क लादण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय मूर्खपणाचा आहे. यातून अमेरिकेला कोणताही फायदा होणार नाही, अशा शब्दात प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सॅक्स म्हणाले, की अमेरिका इतक्या काळापासून आपल्या वर्चस्ववादी शक्तीचा वापर करत आहे की त्यांना वाटते की ते जगाच्या प्रत्येक भागावर राज्य करू शकतात.

पण हा त्यांचा भ्रम आहे. ट्रम्प गोंधळलेले आहे आणि परिस्थिती सावरण्यात अपयशी ठरत आहे. भारतावर टैरिफ लादणे कोणत्याही मानकांनुसार मूर्खपणाचे होते. ट्रम्प ब्रिक्स गटाचा द्वेष करतात कारण हे देश अमेरिकेसमोर उभे राहतात. टॅरिफ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करते.

ट्रम्प यांचा निर्णय राजकीय व्यवस्थेचे पतन आहे. अमेरिकेत, ट्रम्पची धोरणे अपयशी ठरतील. भारताने अमेरिकेवर विश्वास ठेवू नये, जागतिक मूल्य साखळीत भारत चीनची जागा घेऊ शकते, असा विश्वास ठेवू नये. आजच्या घडीला चीन, रशिया आणि ब्राझील हे भारताचे भागीदार आहे.

अमेरिकन शिष्टमंडळाचा भारत दौरा रद्द

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या चर्चेला आता खीळ बसली आहे. चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्यानंतर सहाव्या फेरीसाठी चर्चा करण्यासाठी भारतात येणाऱ्या अमेरिकन शिष्टमंडळाचा दौरा रद्द करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर ५० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. जागतिक स्तरावर कोणत्याही देशांपेक्षा हा सर्वाधिक टॅरिफ आहे. यानंतर दोन्ही देशांकडून व्यापाराच्या वाटाघाटी थांबविण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

कृषी क्षेत्रातील अटीने करार रखडला

कृषी क्षेत्रात अमेरिकेला प्रवेश देण्यास भारताने नकार दिला आहे. शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी भारत दीर्घकाळापासून या भूमिकेवर ठाम आहे. मात्र ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका त्यांच्या कृषी उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ठोस तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे भारतावर लादलेले टैरिफ कमी होण्याची अनिश्चितता कायम आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---