मुंबई : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी गौमांस असलेली बिर्याणी खालली असल्याचे इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यात इम्तियाज जलील यांनी उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांची पोलखोल केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
इम्तियाज जलील पत्रकार परिषदेत म्हणाले की, “संजय राऊत यांनी अनेकदा गौमांस असलेली बिर्याणी खालली असून ते बंद दाराआड ती खात असतात. इतकंच नाही तर त्यांना गौमांस असलेले कटलेटही हवे असतात. कुर्मा तर अगदी चाटून-पुसून खातात. परंतु राजकीय अस्तित्व टिकवून राहावे म्हणून ते आपल्या बोलण्यातून त्याचा विरोध करत असतात.” इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांवर संजय राऊतांनी अद्याप तरी उत्तर दिलेले नाही किंवा आपली भूमिकाही मांडली नाही. त्यामुळे जलील यांच्या आरोपांवर त्यांची भूमिका काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गो-भक्षक हवेत की गो-रक्षक
स्वतःला आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी म्हणणारे उद्धव ठाकरे इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांवर काय स्पष्टीकरण देणार आहेत? जर ते खोटे असेल तर संजय राऊत यांनी जलील यांच्यावर मानहानीचा दावा करावा. नाहीतर है पक्कं मानलं जाईल की महाराष्ट्रात गाईची कत्तल व गोमांस विक्री यांच्यासारख्या नकली हिंदुत्ववादींमुळेच होते आहे. जनतेनेही अशा गोमांस भक्षकांना चांगला धडा शिकवला पाहिजे. जनतेला हे निश्चित कराव लागेल की राज्यात गो-भक्षक हवेत की गो-रक्षक
– गोविंद शेंडे, क्षेत्र मंत्री विहिंप