शहरात 16 केंद्रांवर सोमवारी लसीकरण मोहीम

तरुण भारत लाईव्ह न्यूज  : 9 महिने ते 5 वर्षीय मुलांना गोवर प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे.

शासन निर्देशानुसार शहरातील 16 केंद्रांवर 19 डिसेंबर रोजी गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती मनपा रुग्णालय प्रशासनाने दिली.
राज्यात गोवरची साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. राज्यासह जिल्ह्यात गेल्या दोन अडीच वर्षात कोरोना संसर्गामुळे बहुतांश ठिकाणी लहान मुलांच्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला. त्यामुळे सध्यस्थीतीत गोवरची रुग्ण संख्या मोठया प्रमाणावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मनपातर्फे आरोग्य सर्वेक्षण मोहीम

राज्यात मुंबई, पुणे तसेच अन्य महानगरात गोवरची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे, असे असली तरी साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन निर्देशानुसार आरोग्य सर्वेक्षण आणि 15 ते 25 डिसेंबर 2022 तसेच 15 ते 25 जानेवारी 2023 अशी दोन टप्प्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात मनपा आरोग्य विभाग आणि आशा वर्कर्सतर्फे आरोग्य सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

12 रुग्ण आढळले पॉझिटिव्ह

आतापर्यंत जळगाव शहरात झालेल्या आरोग्य सर्वेक्षण मोहिमेदरम्यान गोवर आजाराचे 169 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 12 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सोमवार 19रोजी 16 केंद्रांवर विशेष लसीकरण मोहीम

जळगाव शहरात सोमवार 19 डिसेंबर रोजी शाहूनगर परिसरात डॉ. तल्हार क्लिनिक, एसएमआयटी कॉलेज, दक्षतानगर पोलीस कॉलनी, शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनगरात अलहिदा हॉस्पिटल, भिकमचंद जैन रुग्णालय, डॉ. अशोक पाटील हॉस्पिटल सुभाष चौक, जुने जळगाव डॉ. राजेंद्र चौधरी, गजानन मंदिर, सुप्रीम कॉलनी, दत्त मंदिर सदगुरुनगर, मनपा अंगणवाडी क्र.48 मासूमवाडी, तांबापुरा भिलाटी पोलीस चौकी, अंगणवाडी क्र.39 रामनगर, रेणुकानगर सप्तश्रृंगी मंदिर मेहरुण, निमडी शाळा पिंप्राळा आणि रामनगर, हरिविठ्ठल नगर परीसरात ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळ अशा 16 ठिकाणी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

पाल्यांना लसीकरण करणे आवश्यक- रुग्णालय प्रशासन

शहरातील 9 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे, नागरिकांनी सोमवार 19 डिसेंबर रोजी निर्देशित केलेल्या 16 केंद्रांवर विशेष मोहिमेत त्यांच्या लहान मुलांना लसीकरण करून घ्यावे.

डॉ.राम रावलाणी,

वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय,

जळगाव.