Snakebite : जळगावात ७० दिवसात सर्पदंश बाधित १३० जणांचा वाचला जीव

राजेंद्र आर. पाटील
जळगाव : जून महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात सर्पदंश होण्याच्या घटनेत वाढीला सुरुवात झाली. जून, जुलै आणि ऑगस्ट या पावसाळ्याच्या ७० दिवसामध्ये १३० जणांना सर्पदंश होवून त्यांची प्रकृती गंभीर झाली. या सर्व बाधितांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचाराअंती या बाधितांचा जीव वाचला. तंदुरुस्त होवून ते घरी परतलेत. शासकीय रुग्णालयामध्ये कार्यत्पतर यंत्रणा, उपलब्ध साधनसामग्री याच्या जोरावर या अशा रुग्णांना मोठा दिलासा लाभत आहे.

पावसाळ्यात साप सर्वत्र आढळून येतात. त्यामुळे सर्पदंश होण्याच्या घटनाही घडतात. अशा परिस्थीतीत रुग्णांच्या उपचाराच्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लसी व औषधसाठा मुबलक आहे. तसेच बाधितासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम तत्पर आहे.

पावसाळ्याला जुन महिन्यात सुरुवात झाल्याबरोबर सर्पदंश होण्याच्या घटना जिल्ह्यात घडू लागल्या. जुन महिन्यात महिला पुरुष अशा एकुण ३९ जणांना सर्पदंश होवून त्यांना विषबाधा झाली. या सर्वांना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले. या बाधितांना इंजेक्शन तसेच औषधोपचार करुन त्यांचा डिस्चार्ज देण्यात आला. सर्व बाधितांचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.

१ ऑगस्ट ते दहा  ऑगस्ट दरम्यान २१ जणांचा सापाने चावा घेतला. सर्पदंश होवून जिल्ह्यात एकुण १३० जण अत्यवस्थ झाले. परंतु वेळीच  निदान व उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचविण्यास शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला यश मिळाले आहे.

२४ तास रुग्ण अॅडमिट गरजेचा

सर्पदंश केल्यानंतर रुग्णाला किमान २४ तास अॅडमिट करुन घेण्यात येते. त्याला दंश केलेला सापात विषाचे प्रमाण किती, आहे, रूग्णाची शारिरीक मानसिक स्थिती काय? याची माहिती डॉक्टरांना होते. अशा रुग्णांची डीटीसीटी तसेच अॅलर्जी या चाचण्या घेतात. विषारी सपनि दंश केला असल्यास अशा रुग्णांना तीन ते दहा दिवस बरे व्हायला लागतात. हे रुग्ण शंभर टक्के तंदुरूस्त होतात.

 

 

सर्प स्वतःहून दंश करत नाही 

सर्प कधीही स्वतःहून पुढे येऊन चावत नाही. साप डुख धरत ७ नाही. सापाला माणसासारखी दृष्टी नसते. त्याला हात, पाय, बाह्यकानदेखील नसतात. कुणाचा चेहरा लक्षात राहील इतका त्याचा मेंदू तल्लख नाही. म्हणून कोणताच साप बदला घेत नाही. साप चावला म्हणजे मृत्यू नाही. प्रत्येक साप विषारी नसतो आणि विषारी सर्पदंश झाला तरी योग्य वेळेत योग्य वैद्यकीय उपचार केले तर रुग्ण १०० टक्के वाचतो. सर्प वाचविणे आपले कर्तव्य आहे, मात्र रिकामे धाडस करू नये. स्वतःचा जीव वाचवणार तरच सर्प वाचवता येतील.

– बाळकृष्ण देवरे, संस्थापक, वन्यजीव संरक्षण संस्था