जळगाव : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्षक चंद्रशेखर बावनकुळे यांचा संपूर्ण संघटनात्मक दौरा सुरु झाला आहे. ते आज मंगळवारी जळगाव दौऱ्यावर असून दिवसभर संघटनात्मक दौऱ्याच्या माध्यमातून बैठका व आगामी निवडणुकीच्या संदर्भात रणनीती ठरवण्यात येणार आहे.
दरम्यान, युवा मोर्चातर्फे शहरात बाईक काढण्यात आली. यावेळी दुचाकीला भाजपचे झेंडे लावून व गळ्यात उपरणे घालून, जोरदार घोषणा देत निघालेल्या या रॅलीने भाजपमय वातावरण करून टाकत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीला अभूतपूर्व असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचा आजचा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात बाईक रॅलीने झाली ज्यात स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाईक चालवत रॅलीचे नेतृत्व केले.