बारावीच्या निकालात जळगाव जिल्ह्यात ‘हा’ तालुका अव्वल तर बोदवड तालुक्यात सर्वाधिक कमी उत्तीर्ण

जळगाव : बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात जळगाव जिल्हयात मुलींनी अव्वल स्थान पटकविले आहे. जळगाव जिल्ह्यातून ४५ हजार ३१ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. यापैकी  ४४ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यात २५ हजार २०६ विद्यार्थी पैकी २३ हजार ६२६ तर १९ हजार ६१३ विध्यार्थिनीपैकी १८ हजार ९०२ विद्यार्थिनी उत्तीर्ण  होऊन जिल्ह्यात अव्वल स्थान पटकविले आहे. . मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.७३ इतकी असून ९६.३७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

जिल्ह्यात निकालाचा तालुकानिहाय विचार करता चोपडा तालुका ९७. १५ टक्के उत्तीर्ण होऊन प्रथम क्रमांकावर आहे. तर बोदवड तालुक्याचे सर्वात सर्वात कमी म्हणजे ८८.२० टक्के टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तालुका व उत्तीर्णांची टक्केवारी
अमळनेर – 95.92
भुसावळ  – 95.06
भडगाव  – 96.14
चाळीसगाव – 93.99
चोपडा – 97.15
धरणगाव – 96.02
एरंडोल – 90.28
जळगाव – 92.82
जामनेर – 94.52
मुक्ताईनगर – 94.78
पारोळा- 93.89
पाचोरा – 95.50
रावेर – 93.34
यावल – 94.62
जळगाव महानगरपालिका 96.11