जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर तर्फे जळगाव येथील NHAI विरोधात ‘आरती ओवाळू’ आंदोलन करण्यात आले.
मागील वर्षी जळगाव जागर यात्रा जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग वरील खड्डे व उड्डाणपूल त्वरित व्हावे यासाठी जळगाव जागर यात्रा काढण्यात आलेली होती. त्या पार्श्वभूमीवर आज बुधवार, 4 रोजी जागर यात्रेला 12 महिने उलटून सुद्धा जळगाव शहरातील हायवेवरचे खड्डे जसेच्या तसे आहेत म्हणून अशा या कुंभकर्ण प्रशासनाचा निषेध आणि या बिनकामी प्रशासनाचा आरती ओवाळून निषेध करण्यात आला. यात NHAI अधिकारी शिवाजी पवार यांची अगरबत्ती फुलांसोबत आरती ओवाळण्यात आली.
जळगाव शहरामधील खोटे नगर ते कालंकी माता मंदिरापर्यंत उड्डाणपूल व्हावे आणि त्या हायवेवरील खड्डे त्वरित बुजवावे म्हणून शिवाजी पवार हे जळगाव शहरावर प्रसन्न व्हावे आणि शहरातील हायवेवरील रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर तर्फे आरती ओवाळू आंदोलन करण्यात आले.
त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्या त्यांच्याकडे मांडण्यात आले. येणाऱ्या काही दिवसातच डांबराने खड्डे बुजवण्यात येतील अशी एनएचएआय श्री पवार यांच्याकडून सांगण्यात आले. सोबतच जळगाव शहरातील बायपास बांभोरी ते तरसोद रस्ता लवकरात लवकर वाहनांसाठी सुरू करण्यात यावा, यासाठीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने NHAI च्या अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरले. जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौक इच्छादेवी चौक अजिंठा चौक येथील सर्कल तोडून सिग्नल करण्यात यावे जेणेकरून अपघाताच प्रमाण कमी होऊन जीवित हानी होणार नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. शहरअध्यक्ष किरण तळले जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे, सचिव जितेंद्र पाटील, उपसचिव कुशाल ठाकूर, हरिओम सूर्यवंशी, पवन सपकाळे, राजू डोंगरे, दीपक राठोड, अशितोष जाधव, निहीर सोनार, सोनू सोनार, साजन पाटील, ऍड. सागर शिंपी, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील , मनसैनिक अनिल दिघे, पंकज चौधरी, नयन ठाकूर, आधी आजी-माजी पदाधिकारी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.