---Advertisement---
पाऊस : गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यातच हवामान विभागातर्फे उत्तर महाराष्ट्रात गुरुवार पासून तीन दिवसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या तीन दिवसामध्ये काही ठिकाणी तुरळक तर ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वायव्य बंगाल उपसागर आणि ओडिशा किनारपट्टी भागात कमी दाबाचे आवरण तयार झाले आहे. ते वायव्य दिशेकडे सरकरणार आहे. शिवाय कमी दाबाची रेषा मध्य प्रदेश भागातून जात आहे. त्यामुळे पावसाची शक्यता आहे.
या ठिकाणी होईल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
गुरुवारी नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नगरसह २० जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस होईल आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज आहे. हीच स्थिती शुक्रवारी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत
---Advertisement---