पुण्यात महाविकास आघाडीतर्फे निकाला आधीच आनंदोत्सव ; फलक लावून विजयी उमेदवारांचा केले अभिनंदन

पुणे  :  देशात लोकसभा निवडणूक सात तर राज्यात पाच टप्प्यात होत आहे. यात चौथ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड येथे १३ मे रोजी मतदान पार पडले आहे. तर २० मे रोजी राज्यात शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होईल. मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. देशात निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली नसतांना पुणे येथे  कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांचे फलक झळकावून आनंदोत्सव केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सारसबाग परिसरात आबा बागुल मित्र परिवाराने महा विकास आघाडीचे उमेदवार विजयी फलक लावले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहळ यांचे बॅनर लावून विजयउत्सव साजरा केला आहे.  मतदार लोकसभेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहात असतांना निकाल लागण्याआधीच भाजप आणि महाविकास आघाडीला पोस्टर लावण्याची घाई झाल्याचे यातून दिसत आहे..  महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रवी धनगेकर यांचे बॅनर लावत मतदारांनी निर्धार करून मारला शिका खासदार आमचा झाला पक्का गुलाल आमचा असा  उल्लेख असणारे बॅनर पुणेकरांचे लक्ष वेधून घेतोय.  पुण्यात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे याचा फायदा महायुतीला की महाविकास आघाडी होईल  याकडे सर्वच लक्ष लागले आहे.  परंतु, पुण्यातील भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांना आधीच विजय घोषित केलं.