रोहिणीत सेवानिवृत्त अभियंत्याकडे धाडसी घरफोडी सव्वा लाखांचा ऐवज चोरीला; गुन्हा दाखल

तरुण भारत लाईव्ह ।११ जानेवारी २०२३। चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथे मध्यरात्री तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला तर सेवानिवृत्त अभियंत्याच्या बंद घरातून एक लाख 22 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याने गावात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच वेळी चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावातील नारायण तात्याराम वाघ (वय-59, ह.मु.कल्याण) हे सेवानिवृत्त अभियंता वास्तव्यास आहेत.
ते गावाला गेल्यानंतर चोरट्यांनी गावातील घराचा कडीकोंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेलील एक लाख 10 हजारांची रोकड व 12 हजार रुपये किमतीचा हळदी कुंकवाचा करंडा असा एकूण एक लाख 22 हजारांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना 6 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ते 8 जानेवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. नारायण तात्याराम वाघ यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गावातील तीन ठिकाणी चोरट्यांनी अशाच पद्धत्तीने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची बाबही उघडकीस आली आहे. तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हर्षा जाधव करीत आहे.