जिल्ह्यात ३६ संवेदनशील तर ३ मतदान केंद्रे उपद्रवी

 

जळगाव : देशपातळीवर १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघ असून त्यात ३ हजार ८८६ मतदान केंद्रांवर निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी तयारी केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात तीन उपद्रवी केंद्रे असल्याची नोंद आहे.
जिल्ह्यात जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. त्यात जळगाव शहर ३५९, जळगाव ग्रामीण ३४०, अमळनेर ३२०, एरंडोल २९०, चाळीसगाव ३४१, पाचोरा ३३२ अशी मतदान केंद्र आहेत. यात ३६ संवेदनशील मतदान केंद्रांची नोंद असून त्यात प्रशासनपातळीवर सर्वे परिक्षण करण्यात आले

हे आहेत उपद्रवी मतदान केंद्रे
जिल्ह्यात उपद्रवी केंद्रांची संख्या ३ आहे. यात मतदान केंद्र क्रमांक १०९ भडगाव येथे गत २०१९ लोकसभा मतदानावेळी पुनर्मतदानाचा मॉकपोल डाटा मतदान केंद्राध्यक्षांकडून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियपूर्वी डिलीट करण्यात आलेला नसत्याची नोद आहे. तसेच पाचोरा तालुक्यात वडगाव जोगे मतदान केंद्र क्रमांक २९२ येथे थेट मतदान केंद्रावर येण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने मतदान १० टक्केपर्यंत होते. असे जळगाव लोकसभा मतदारसंघात रावेर मतदारसंघात जि.प.उर्दू शाळा रावेर मतदान केंद्र क्रमांक १०६ या ठिकाणी विविध गुन्हे कलमांतर्गत एफआयआर दाखल असल्याची नोंद असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.