घरफोडी करणारा संशयीतला एलसीबीने केली अटक

अमळनेर :  चाळीसगाव तालुक्यातुन घरफोडी करणाऱ्या संशयित फरार आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यास पुढील कार्यवाहीकरिता अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे ५ महिन्यांपूर्वी घरफोडीचा प्रकार घडला होता.  या घरफोडीतील संशयित आरोपी किरण तुकाराम बारेला ((सोलंकी) वय २७, मूळ रा. दुदखेडा ता. सेंधवा जि. बडवानी, हल्ली मु. टाकळी प्र. दे. ता. चाळीसगाव) हा फरार झाला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला फरार आरोपीला अटक करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी त्यांचे पथक तयार केले होते. या पथकाने चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. दे. येथे जाऊन संशयित आरोपीला शिताफिने ताब्यात घेऊन अटक केली. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पाच महिन्यापूर्वी सावखेडा गावी चोरी केल्याची माहिती दिली आहे. त्याला

पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. हि  कारवाई निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, हेडकॉन्स्टेबल कमलाकर बागुल, पोहेकॉ संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, चालक मोतीलाल चौधरी आदींनी केली आहे.