हवामान: राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे सगळयांनाच दिलासा मिळाला आहे, पण अनेक ठिकाणी हवामान विभागाकडून पावसाचा इशारा वर्तवला आहे. काल रात्री पासून जळगाव मध्ये पाऊस सुरु असून अश्याच हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे आवरण निर्माण झाले आहे.त्यामुळे पूर्व मध्यप्रदेश आणि मध्य प्रदेशमधून कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणपर्यंत तयार झाला आहे. यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
१६ सप्टेंबर रोजी जळगावसह राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.या जिल्ह्याना देण्यात आला आहे रेड अन् ऑरेंज अलर्ट १६ सप्टेंबर रोजी दहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यात खान्देशातील नंदूरबार, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना विदर्भातील अकोला, नागपूर, वर्धा, तसेच मुंबईतील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यास पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट विदर्भातील अमरावती जिल्ह्यास दिला आहे.