Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

नवी मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई विमानतळाचा प्रकल्प रखडला आहे. मात्र,आता विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. विमानतळावर सध्या दोन धावपट्ट्यांचे काम पूर्ण झाले आहे. मे 2025 पर्यंत नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीत भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान सुखोई 30 लँडिंग करण्यात आली. ज्यामुळे विमानतळाचे नियमित ऑपरेशन सुरू करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या चाचणीमुळे विमानतळाच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

नवी मुंबई विमानतळावर हवाई दलाच्या सुखोई फायटर विमानाचे यशस्वी टेस्ट लँडिंग झाले,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय वायुदलाच्या सी 295 या प्रकाराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आले. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर त्याला वॉटर सॅल्युटद्वारे मानवंदना देण्यात आली.

विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानानेही या धावपट्टीपासून काही अंतरावर उड्डाण करत फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी 295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

देवेंद्र फडणवीसांनी केले सिडकोच्या कामाचे कौतुक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशस्वी लँडिंगसाठी सिडकोला विशेष धन्यवाद दिले. त्यांनी सांगितले की, “आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विरोधकांनी अनेकदा या प्रकल्पावर टीका केली होती, परंतु आम्ही आमच्या वचनांवर ठाम होतो. 9 कोटी प्रवाशांची क्षमता असलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या विमानतळाच्या निर्मितीसाठी महायुती सरकारने विशेष योगदान दिले आहे.” असे प्रतिपादन उपमख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

नवी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं फोटोसेशन
भारतीय वायूदलाचे सी 295 हे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वैमानिकांचे स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी विमानात बसून फोटोसेशन केले. एकनाथ शिंदे यांनी विमानाच्या खिडकीत बसून बाहेर हात उंचावत ऐटीत एक फोटोही काढला. हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.