नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नागपूरमध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या ५२० किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रा्ज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर पोहोचले आहेत. नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे विमान आले असता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व बडे नेते आणि अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचून वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवली. पंतप्रधान मोदींनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. 520 किलोमीटर अंतराचा हा रस्ता नागपूर आणि शिर्डीला जोडणार आहे.
उद्घाटनाच्या वेळी मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये ७०१ किलोमीटरच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. आता ते मुख्यमंत्री आहेत व फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत.