अनुदानात नावे समाविष्ट करा अन्यथा.. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा

सोयगाव :  ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचीही पात्र यादीतून नावे वगळणी केल्याचा प्रकार सोयगावात उघड झाला आहे.  याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) गुरुवारी स्वातंत्र्य दिनी तीव्र निदर्शन करणार असल्याचे निवेदन बुधवरी सोयगाव तहसीलदार मनीषा मेने यांना दिले आहे. हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार) गट अध्यक्ष डॉ. इंद्रजित सोळुंके, सोयगाव शहराध्यक्ष रवींद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की,  शासनाने नुकत्याच कापूस व सोयाबीन पिकांसाठी अर्थसाह्य अनुदान देण्याची घोषणा केली आहे.  मात्र इ पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचीही नावे वगळणी करण्यात आली असून त्या शेतकऱ्यांना अर्थसाह्य अनुदानापासून वंचीत ठेवण्यात आले आहे.  कापूस, सोयाबीन पिकांची तालुक्यातील सर्वच भागात नुकसान झाले आहे. त्यामुळे ई पीक पाहणीची जाचक अट शिथिल करून सर्वांना सरसगत पाच हजार रु अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.  ई पीक पाहणी करूनही त्यात नावे समाविष्ट नाही अशा शेतकऱ्यांना तातडीने नावे समाविष्ट करून लाभ द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.  निवेदनावर डॉ. इंद्रजीत साळूंके, सोयगाव शहराध्यक्ष रवींद्र काळे, दीपक देशमुख, अजय नेरपगारे, समाधान थोरात, कृष्णा भैय्या जुनघरे,  चंद्रकांत पाटील,आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.