Increase in drug prices: 1 एप्रिलपासून 800 औषधांच्या किमतीत वाढ होणार आहे. इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सरकारने घाऊक किंमत निर्देशांकात अनेक बदल केले आहेत. या औषधांच्या यादीमध्ये वेदनाशामक, प्रतिजैविक आणि संसर्गविरोधी औषधांचा समावेश आहे.
औषधांच्या या यादीमध्ये पॅरासिटामॉल, ॲझिथ्रोमायसीन सारखी अँटीबायोटिक्स, ॲनिमिया औषधे, जीवनसत्त्वे आणि लोह यांचा समावेश आहे. कोविड-19 आजारामध्ये वापरण्यात येणारी औषधे आणि स्टिरॉइड्स देखील या यादीत आहेत.
पॅरासिटामॉलच्या किमतीत 130 टक्क्यांनी वाढ झाली असून एक्सपिएंट्सच्या किमतीत 18-262 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्लिसरीन आणि प्रोपीलीन ग्लायकॉल, सिरपसह सॉल्व्हेंट्स अनुक्रमे 263 टक्के आणि 83 टक्क्यांनी महाग झाले आहेत. मध्यंतरीच्या किमती 11 ते 175 टक्क्यांच्या दरम्यान वाढल्या आहेत. तर पेनिसिलिन जी 175 टक्क्यांनी महाग झाली आहे.
यापूर्वी 2022 मध्ये औषधांच्या किमतीत 12 टक्के आणि 10 टक्क्यांनी वाढ झाली होती. अहवालानुसार, वर्षातून एकदाच औषधांच्या किमतीत वाढ करण्यास मान्यता दिली जाऊ शकते. .