IND vs AUS 1st Test : भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियावर पर्थ कसोटीत मजबूत पकड घेतली आहे. पहिल्या डावात अवघ्या पाच धावांवर बाद झालेल्या विराट कोहलीने पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन केले. विराट कोहलीने 94 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर तुफानी फलंदाजी करताना शतक ठोकले.
विराटने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी पर्थ स्टेडियममध्ये शतक झळकावलं आहे. विराटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 30 वं तर 81 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं आहे. विराटने या शतकासह दिग्गज सचिन तेंडुलकर याचा शतकांचा महारेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच विराटच्या या शतकानंतर कर्णधार जसप्रीत बुमराह याने भारताचा दुसरा डाव हा 134.3 षटकांमध्ये 6 बाद 487 धावांवर घोषित केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर आता 534 धावांचं मोठं आव्हान आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियात कोहलीचा विक्रम
या कसोटी सामन्यापूर्वी कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर सहा शतके झळकावली होती. 13 सामन्यात 54.08 च्या सरासरीने 1352 धावा केल्या. यावरून त्यांचे वर्चस्व समजू शकते. यावेळी त्याला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये आणखी चांगली कामगिरी करायची आहे. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने हे सिद्ध केले. त्याची नजर या मालिकेत भरघोस धावा करण्यावर आहे.