---Advertisement---

IND vs AUS : सेमीफायनलआधी टीमला मोठा झटका, सलामीवीर फलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

by team
---Advertisement---

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील अंतिम सामन्यात रविवारी २ मार्चला टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवला. या विजयासह सेमी फायनलला कोणता संघ कुणाविरुद्ध खेळणार? हे स्पष्ट झालं. त्यानुसार सेमी फायनल मधील पहिल्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. हा सामना ४ मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. तर उपांत्य फेरीतील दुसर्‍या सामन्यात ५ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड भिडणार आहेत. हा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये होणार आहे. सेमी फायनल सामन्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. फलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

टीम इंडियाविरुद्धच्या सेमी फायनल सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला तगडा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा २९ वर्षीय सलामीवीर फलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सेमी फायनल सामन्याआधी मोठा धक्का बसला आहे. मॅथ्यू शॉर्ट या उर्वरित स्पर्धेतून बाहेर झाल्याची माहिती आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

ज्याची भीती तसंच झालं
मॅथ्यू शॉर्ट याला अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात २८ फेब्रुवारी रोजी सामना खेळवण्यात आला. अफगाणिस्तानने पहिल्या डावात बॅटिंग केली. मात्र दुसऱ्या डावात पावसाने एन्ट्री घेतली. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामन्यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने मॅथ्यू शॉर्ट याच्या दुखापतीबाबत अपडेट दिली. मॅथ्यूला निट धावता येत नाही. त्यामुळे उपांत्य फेरीआधी तो फिट होणं अवघड आहे, अशी भीती स्टीव्हन स्मिथ याने अफगाणिस्तान विरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर व्यक्त केली होती. मॅथ्यूला या सामन्यात फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली होती.

दरम्यान मॅथ्यूच्या जागी ऑस्ट्रेलिया टीममध्ये ऑलराउंडर कूपर कॉनोली याचा समावेश करण्यात आल्याची माहिती, आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियासोबत मोठा ‘गेम’
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा आणि अ‍ॅडम झॅम्पा.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment