---Advertisement---

IND vs BAN, 1st Test : इंडियाचे नेतृत्त्व केएल राहुलच्या खांद्यावर; सामना कधी, कुठे?

by team
---Advertisement---

चितगाव:  भारतीय संघाची नुकतीच बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपली. आता भारताला बांगलादेशविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका १४ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्त्व केएल राहुलच्या खांद्यावर असेल.

 

या मालिकेसाठी काही खेळाडू भारतटाऊन बांगलादेशला जाणार आहेत. टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत १-२ ने पराभवाचा सामना करावा लागला, पण आता बलाढ्य भारतीय संघ कसोटी मालिकेत बांगलादेशकडून बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळवला जाणार आहे. हा सामना १४ ते १८ डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. तर दुसरा सामना ढाका येथे खेळवला जाणार आहे. हा सामना २२ ते २६ डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment