तरुण भारत लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । भारत व बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना चांगला रंगतदार झाला होता. बांग्लादेशच्या अखेर च्या खेळाडूने भारताच्या हातचा मॅच खेचून नेला होता. त्यानंतर आज बांगलादेश विरुद्धच्या दुसरा एकदिवसीय सामना खेळविला गेला हा सामना भारताला जिंकणं अत्यंत महत्वाच होते. मात्र भारताने हा सामनाही गमावला आहे.
भारतीय संघ अडचणीत सापडला असताना दुखापत बाजूला ठेवत कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरला. रोहितने धडाकेबाज फटकेबाजी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण अखेरच्या चेंडूवर सहा धावांची गरज असताना रोहितला षटकार खेचता आला नाही आणि भारताचा पाच धावांनी पराभव झाला. या पराभवासह भारताने ही वनडे मालिका गमावली आहे.
भारताला 24 चेंडूत 41 धावांची गरज असताना बांगलादेशने खुबीने रोहित शर्माला स्ट्राईकपासून दूर ठेवले. मुस्तफिजूनरे 48 वे षटक निर्धाव टाकले. यामुळे रोहित स्ट्राईकवर आला त्यावेळी भारताला 12 चेंडूत विजयासाठी 40 धावांची गरज होती. 49 वे षटक टाकणाऱ्या मोहमद्दुल्लाला रोहितने दोन षटकारांसह 20 धावा केल्या. यात त्याला दोन जीवनदानही मिळाले. मात्र शेवटच्या चेंडूवर सिराज बाद झाला.
मुस्तफिजूरने पहिला चेंडू निर्धाव टाकला. रोहितने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. सामना चार चेंडूत 16 धावा.. तिसरा चेंडूवर रोहितने अजून एक चौकार मारत सामना 3 चेंडूत 12 धावा असा आणला… मुस्तफिजूरने हा चेंडू निर्धाव टाकत रोहितवर दबाव टाकला. आता सामना 2 चेंडू 12 धावा असा आला होता. रोहितने समोर षटकार मारत सामना 1 चेंडू 6 धावा असा आणला. शेटवच्या चेंडूवर मात्र रोहितला षटकार मारण्यात अपयश आले अन् बांगलादेशने मालिका जिंकली.