तरुण भारत लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । भारत व बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना चांगला रंगतदार झाला होता. बांग्लादेशच्या अखेर च्या खेळाडूने भारताच्या हातचा मॅच खेचून नेला होता. त्यानंतर आज बांगलादेश विरुद्धच्या दुसरा एकदिवसीय सामना खेळविला जात असून हा सामना भारताला जिंकणं अत्यंत महत्वाच आहे.
दरम्यान, टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि कॅप्टन रोहित शर्मा सध्या आपल्या खराब फॉर्मशी झगडत असून बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला दुखापत झाली आहे.
रोहित शर्मासोबत ही घटना बांगलादेशच्या डावाच्या दुसऱ्या षटकात घडली. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर इनामुल हकने एक शॉट खेळला आणि चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला, पण यादरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली. बोट रक्तबंबाळ झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.