India vs New Zealand 2nd Test भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीला पुण्यात आजपासून सुरुवात झाली.न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर याने अप्रतिम दर्जाची फिरकी गोलनंदाजी करत किवी संघाला चांगलाच दणका दिला .
वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विन या फिरकी जोडीने न्यूझीलंडला पहिल्या डावात 259 धावांवर गुंडाळलंय. वॉशिंग्टने 7 तर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वॉशिंग्टन सुंदर याने एकट्याने 7 विकेट्स घेत न्यूझीलंडला 259 धावावंर ऑलआऊट करण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे.
तर दुसर्या बाजूला आर अश्विन याने सुंदरला अप्रतिम साथ दिली. अशाप्रकारे टीम इंडियाच्या या फिरकी जोडीनेच पाहुण्या किवींचा करेक्ट कार्यक्रम केला. आता भारतीय गोलंदाजांनंतर फलंदाजांवर मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.