डरबन: भारताच्या अंडर 19 महिला टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा T20 सामना जिंकला. या विजयासह भारतीय महिला टीमने 5 टी 20 सामन्यांची सीरीज जिंकली आहे.
एक सामना बाकी, पण..
मालिकेतील एक सामना अजून बाकी आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला, तरी सीरीज भारताच्याच नावावर होईल. सीरीजमधील पाचवा व शेवटचा टी 20 सामना 4 जानेवारीला खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेची महिला टीम प्रतिष्ठा राखण्यासाठी हा सामना खेळेल.
भारताच्या अंडर 19 महिला टीमच्या दोन गोलंदाज फलक आणि नजलाने मिळून दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवलं. नजलाने 3 ओव्हरमध्ये 4 धावा देऊन 3 विकेट काढल्या. फलकने 4 ओव्हर्समध्ये 11 धावा देऊन 2 विकेट काढल्या. दोघींनी किफायती आणि प्रभावी गोलंदाजी केली. परिणामी दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 महिला टीमने चौथ्या सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून फक्त 86 धावा केल्या. भारताने चौथा टी 20 सामना 15 ओव्हर पूर्ण होण्याआधीच जिंकला. भारताच्या दोन गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेची वाट लावली. त्यामुळे टीम इंडिया हा सामना लवकर जिंकणार असा अंदाज होता.