IND vs SL: अन् शिवम भावुक झाला; ‘या’ क्षणाची..

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज शिवम मावीने चार षटकात 22 धावा देत चार बळी घेतले. या स्वप्नवत पदार्पणानंतर तो भावूक झाला. गेली सहा वर्षे या क्षणाची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवम मावीने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट काढली. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकार खाल्ला. पण त्यानंतर पथुम निसांकाला एका सुंदर इनस्विंगवर बोल्ड केलं. पुढच्याच ओव्हरमध्ये मावीने धनंजय डिसिल्वाचा खेळ संपवला.

तसेच पहिल्या दोन ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या. त्यानंतर पुढच्याच दोन ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक केलं. मावीने 12 चेंडूत फक्त 5 धावा दिल्या. या दरम्यान त्याने दोन विकेट काढल्या. मावीने पावरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये विकेट काढून आपलं टॅलेंट सिद्ध केलं.

टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाने 162 धावा केल्या. श्रीलंकेच्या टीमने 160 रन्स केल्या. फक्त 2 धांवी टीम इंडियाने विजय मिळवला. 23 चेंडूत 41 धावा करणारा दीपक हुड्डा प्लेयर ऑफ द मॅच ठरला.