---Advertisement---

IND vs SL T20: शेवटचा सामना साजकोटमध्ये, हार्दिकचा..

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह ।७ जानेवारी २०२३। राजकोट : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात केली. त्यानंतर श्रीलंकेने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. आता राजकोटमध्ये जिंकणारी टीम सीरिजही जिंकेल.

हार्दिक पांड्या या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. हार्दिकच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. हार्दिकच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने आयर्लंड आणि न्यूझीलंडचा पराभव केलाय. त्यामुळे राजकोटमधील सामना जिंकून हार्दिकचा मालिका विजयाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असेल. तसेच टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध एकदाही मायदेशात टी 20 मालिकेत पराभूत झालेली नाही. मायदेशात टीम इंडियाने श्रीलंका विरुद्ध 5 पैकी 4 टी 20 मालिकेत विजय मिळवलाय. तर एक मालिका ड्रॉ राहिली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment