मुंबई: भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ मुंबईत पोहोचला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय आणि तितक्या टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टी 20 सीरीजचा पहिला सामना 3 जानेवारीला खेळला जाईल. या टी 20 सीरीजमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलला विश्रांती दिलीय. टीम इंडियाच टी 20 सीरीज नेतृत्व हार्दिक पंड्याच्या हाती आहे. जाणून घेऊया भारत-श्रीलंका टी-२० सामने लाईव्ह कुठे पाहता येणार.
श्रीलंकेचा संघ प्रीमियर लीग खेळल्यानंतर भारतात येत आहे. लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा संघात समावेश आहे. तर भारताने आपल्या सिनियर खेळाडूंना विश्रांती देऊन युवा संघ निवडला आहे. पांड्या कर्णधार असेल तर सूर्यकुमार यादव उपकर्णधारपद सांभाळेल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना मंगळवारी ३ जानेवारी रोजी मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा पहिला सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल, नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होईल. पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. पहिल्या सामन्याचे थेट प्रसारण डिस्ने हॉटस्टारवर होणार आहे.