Ind vs Zim 3rd T20: भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

नवी दिल्ली :  झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पुनरागमन केले आहे. पहिला सामना गमावल्यानंतर संघाने दुसरा सामना 100 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या T20 मध्ये कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. यष्टिरक्षक संजू सॅमसन, अष्टपैलू शिवम दुबे आणि टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला सलामीवीर यशस्वी जैस्वाल संघात परतले आहेत.

ICC T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ पहिल्या परदेश दौऱ्यावर झिम्बाब्वेला पोहोचला आहे. निवडकर्त्यांनी शुभमन गिलला संघाचा कर्णधार बनवून दौऱ्यावर तरुणांना संधी दिली आहे. पहिल्या T20 मध्ये, यजमान संघाने 115 धावा केल्यानंतर भारताला 102 धावांवर ऑलआउट करून सर्वांना आश्चर्यचकित केले. दुसऱ्या T20 मध्ये इंडियन प्रीमियर लीगचा स्टार अभिषेक शर्माने झंझावाती शतक झळकावून पदार्पण मालिका संस्मरणीय बनवली. तिसऱ्या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसत असला तरी यजमान संघालाही कमी लेखले जात नाही.

भारतीय संघात बदल शक्य

टीम इंडिया तिसऱ्या T20 मध्ये प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. T20 विश्वचषक संघाचा भाग असलेले यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन संघात सामील झाले आहेत. अभिषेक शर्माने गेल्या सामन्यातच शतक झळकावले आहे, त्यामुळे यशस्वी जैस्वालला संधी मिळणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. ध्रुव जुरेलच्या जागी अनुभवी यष्टीरक्षक संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार हे निश्चित मानले जात आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सस्सामन, शिवम दुबे, रिंकू सिंग, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार आणि रवी बिश्नोई.