---Advertisement---

धक्कादायक! बालसुधार गृहातच अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

जळगाव : जळगावातील शासकीय बालसुधार गृहात एका धक्कादायक घटना घडलीय. एका १३ वर्षीय मुलाने १० वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शासकीय मुलांचे बालसुधार गृहमध्ये ३१ ऑगस्ट रोजी रात्री १० वर्षीय बालक झोपलेला असताना सोबत राहणाऱ्या १३ वर्षीय मुलाने अनैसर्गिक कृत्य केले. धक्कादायक म्हणजे, मुलाने त्याला झोपेतून उठवून वरच्या मजल्यावर नेले. तिथे बाथरूमच्या समोरील जागेत त्याला लाथ मारून खाली पाडले व त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तसेच हा प्रकार कुणाला सांगितलास मारहाण करेल, अशी धमकी दिली.

बालसुधारगृहाचे अधिक्षक रविकिरण अहिरराव यांनी पिडीत बालकाला विश्वासात घेवून चौकशी केली असता घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यांनतर अहिरराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment