---Advertisement---

‘तू मला खूप आवडते’ म्हणत विवाहितेशी केले अश्‍लील वर्तन

by team
---Advertisement---

अमळनेर : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहितेला ‘तू मला खूप आवडते’ म्हणत विवाहितेची अश्‍लील वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी २८ वर्षीय पीडितेने फिर्यादी दिली.

गणेश गोकुळ अहिरे रा. सावखेडा असे संशयित आरोपीचे नाव आहे. २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आरोपीनं फिर्यादी पीडिता ही घरातील दैनंदीन काम आवरत असताना आरोपी हा फिर्यादी यांच्या घराच्या मागील दरवज्या जवळ आला व म्हणाला की ‘तु मला खुप आवडते’ माझ्या सोबत चल असे बोलू लागला त्यानंतर फिर्यादी आरोपीला बोलेल की तु इथुन निघुन जा मी विवाहीत आहे. यापुढे येथे येवु नको नाहीतर मी माझ्या पतीला सांगेल याचा त्यास राग आल्याने आरोपी याने वाईट उद्देशाने उजवा हात धरुन मानेवर हात फिरवाला व मी कोणाला घाबरत नाही तु जर कोणाला सांगितले तर मी तुझ्या मुलीला व तुला घरी कोणी नसताना मारुन टाकेल अशी धमकी दीली.

या प्रकरणी पीडितेने अमळनेर पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार संशयित आरोपी गणेश गोकुळ अहीरे रा. सावखेडा यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सुनिल जाधव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment