महिला सरपंचाविरोधात कारवाईसाठी शिरसोली ग्रामपंचायत सदस्याचे बेमुदत उपोषण

जळगाव : बनावट जात वैधता प्रमाणपत्र बनवून त्याचा सरपंच पदासाठी गैरवापर करुन सरपंच झालेल्या महिले विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी.  या मागणीसाठी सोमवार, १ जुलैपासून ग्रामपंचायत सदस्य नितीन अर्जुन बुंधे यांनी शिवतीर्थ मैदानावर बेमुदत उपोषण पुकारले आहे.

नितीन बुंधे यांनी सांगितले की, शिरसोली प्र.बो.च्या  विद्यमान ग्रामपंचायत सरपंच उषा भिमराव पाटील उर्फ उषा अर्जुन पवार टपाल शाखयांनी त्याचे बनावट जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर केलेले आहे. त्याचा गैरफायदा घेऊन आज रोजी “त्या” सरपंच या पदावर कार्यरत आहेत. या बनावट जातीचे वैधता प्रमाणपत्राची माहिती अधिकारात संपूर्ण माहिती घेतली आहे. यानुसार संबंधित धुळे कार्यालयाने उषाबाई भिमराव पाटील या नावाचे जात वैधता प्रमाणपत्र आमचे कार्यालयामार्फत निर्गमीत केलेले नाही असे कळविले आहे. जळगाव कार्यालयाने देखील उषाबाई भिमराव पाटील या नावाचे जात वैधता प्रमाणपत्र आमचे कार्यालयामार्फत निर्गमीत केलेले नाही असे कळविले आहे. तसेच संबंधित वैधता प्रमाणपत्र हे ज्या व्यक्तीस प्रमाणित केलेले आहे त्याचे नावे जगताप सुरज राजु सब डिव्हीजन ऑफीस, भुसावळ यांचे नावे निर्गमीत केलेले करण्यात आलेले आहे. या महिलेला बनावट जात प्रमाणपत्र बनविण्यासाठी मदत करणाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.