कासोदा येथे सफाई कर्मचाऱ्यांचे गुरुवारपासून बेमुदत उपोषण

कासोदा ता. एरंडोल: येथील ग्रामपंचायत सफाई कर्मचारी अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. या वारंवर मागणी करून देखील त्यांच्या समस्या सोडविण्यात येत नसल्याने त्यांनी गुरुवार १८ जुलै पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

ग्रामपंचायत सफाई कर्मचारी हे आठवडे बाजार परिसरात गेल्या ५० ते ६० वर्षापासून राहत आहेत. ग्रामपंचायतने दिलेले घरे ही अतिशय वाईट अवस्थेत असून तेथे अनेक समस्यांना दररोज सामोरे जावे लागत आहे. म्हणून एरंडोल तालुका मेहकर समाज सह , ग्राम पंचायत सफाई कर्मचारी हे गुरुवार १८ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय कासोदा समोर सकाळी १०  वाजेपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. त्यांच्या पूर्वपार समस्या कायम आहेत. असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.  अशा एक नव्हे तर तब्बल एकूण दहा समस्यांचे निवेदन त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे दिलेले आहेत. त्याच्या प्रति त्यांनी मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक , उपमुख्य कार्यकारी अधिकारी , गट विकास अधिकारी पंचायत समिती एरंडोल, सरपंच, ग्रामविकास अधिकारी ,सहाय्यक पोलीस निरीक्षक कासोदा, अध्यक्ष शिवराज्य सफाई कर्मचारी सेना पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर, प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कामगार सेना, सामाजिक विधी सल्लागार ऍड. विवेक चव्हाण , अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर संघ जळगाव यांना देण्यात आले आहे.  या निवेदनावर  महिला मेहतर समाज एरंडोल तालुका अध्यक्ष अनिता सोनू ऐनवाल यांच्यासह ताराबाई सुरेश गोरे ,छाया बन्सी गोरे, राधाबाई घनश्याम टाक, पवन संजय जाधव, अंजली पवन जाधव या मेहतर समाजाच्या कार्यकर्ते व कासोदा ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सह्या आहेत.