Independence Day : जळगावातील ‘या’ शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली १०० मीटर लांब तिरंग्याची रॅली

जळगाव :  येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला  मुख्याध्यापक .एल.एस.तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक एस.एम.रायसिंग यांचेसह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्याध्यापक यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्व विशद करून एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली प्रगती व शिक्षण क्षेत्राची वाटचाल विशद करून उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांची १०० मीटर लांब तिरंग्याची रॅली परिसरात काढण्यात आली. रॅलीत भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचा जयघोष करत परिसरामध्ये देश भावना जागृती करण्यात आली.

विद्यालयातील प्रत्येक इयत्ता मधील विद्यार्थ्यांनी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात देशभक्तीपर विविध गीते गाऊन स्वतंत्र दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.  ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगराज सोनवणे यांनी केले.

पुढील वर्षाच्या ध्वजारोहणा आधी सेवानिवृत्त होणारे ज्येष्ठ लिपिक कैलास म्हसाने व प्रयोगशाळा सहाय्यक रतिलाल पाटील यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमास परिसरातील  माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.