---Advertisement---

India-Pakistan: भारताची कठोर भूमिका; पाकिस्तानमधील आयातीवर बंदी, काय होईल परिणाम ?

---Advertisement---

India-Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढत आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध अनेक पावले उचलली आहेत, ज्यात भारताने सिंधू पाणी करार रद्द केले आहे. तसेच दोन्ही देशांनी एकमेकांसाठी हवाई क्षेत्र देखील बंद केले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक रणनीती लक्षात घेऊन, परराष्ट्र व्यापार महासंचालनालय म्हणजेच (DGFT)पाकिस्तानातून आयात होण्याऱ्या गोष्टींवर बंदी घातली आहे. भारत सरकारने पाकिस्तानातून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे.

वाणिज्य मंत्रालयाने २ मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या परराष्ट्र व्यापार धोरण (एफटीपी) २०२३ मध्ये एक तरतूद जोडण्यात आली आहे. याअंतर्गत, पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानमध्ये येणाऱ्या किंवा निर्यात केलेल्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) अधिसूचनेत म्हटले आहे की ही बंदी राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन घेण्यात आली आहे.

भारत काय निर्यात करतो?

भारत पाकिस्तानला अनेक गोष्टी निर्यात करतो. यामध्ये सेंद्रिय आणि अजैविक रसायने, औषधे, कृषी उत्पादने, कापूस आणि कापसाचे धागे, साखर, मिठाई, प्लास्टिक, यंत्रसामग्री इत्यादींचा समावेश आहे. दोन्ही देशांमधील व्यापारावरील बंदीमुळे, आता भारत पाकिस्तानला औषधे किंवा साखर पाठवू शकणार नाही.

भारत पाकिस्तानातून काय आयात करतो ?

भारत पाकिस्तानातून अनेक गोष्टी आयात करतो. यामध्ये सुकामेवा, टरबूज आणि इतर फळे, दगड, चुना, मुलतानी माती, काचेसाठी ऑप्टिक्स, चामड्याच्या वस्तू इत्यादींचा समावेश आहे.


---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

1 thought on “India-Pakistan: भारताची कठोर भूमिका; पाकिस्तानमधील आयातीवर बंदी, काय होईल परिणाम ?”

Leave a Comment