ICC Champions Trophy 2025 : भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू, असे करा बुकिंग

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार आहे. या स्पर्धेत क्रिकेट चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तो म्हणजे भारत-पाकिस्तान सामना. पण या सर्वांपूर्वी चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आता सर्व सामन्यांच्या तिकिटांच्या किमती जाहीर केल्या आहेत. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सर्व सामन्यांच्या तिकिटांची ऑनलाइन विक्री २८ जानेवारीपासून सुरू झाली आहे. आता भारतीय संघाच्या सामन्यांच्या तिकिटांची विक्रीही आजपासून (३ फेब्रुवारी) सुरू झाली आहे.

हेही वाचा : दारूच्या नशेत पत्नीची वेगळीच मागणी, नकार दिल्याने पतीला दिला बेदम चोप!

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुबईमध्ये आपले सर्व सामने खेळेल. भारतीय संघाच्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री  आज संध्याकाळी ५.३० वाजता सुरु होईल. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अंतर्गत होणाऱ्या भारतीय संघाच्या सामन्यांच्या तिकिटांची किंमत १२५ दिरहम (सुमारे ३ हजार रुपये) ठेवण्यात आली आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी असे करा तिकीट बुक 

– बुकिंगसाठी या संकेतस्थळाला भेट द्या – https://www.iccchampionstrophy.com/tickets

– ‘दुबई होस्टेड मॅचेस’ विभाग निवडा.

– तुम्हाला पहायचा असलेला सामना निवडा. जर तुम्ही परदेशी प्रवासी असाल तर तुमचा पासपोर्ट क्रमांक आणि तुम्हाला खरेदी करायच्या असलेल्या तिकिटांची संख्या प्रविष्ट करा. एखादी व्यक्ती एका सामन्यासाठी ४ पेक्षा जास्त तिकिटे खरेदी करू शकत नाही.

हेही वाचा : धक्कादायक! महिलेने पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या अन्… नेमकं काय झालं?

– तुमची पसंतीची सीट निवडा आणि तुमची माहिती प्रविष्ट करा.

– दिलेल्या पर्यायांनुसार पैसे भरा. तुम्ही एंटर केलेल्या ईमेल आयडीवर तुम्हाला सर्व बुकिंग माहिती देखील मिळेल.

पाकिस्तान-बांगलादेश सामन्याचे सर्वात स्वस्त तिकिट
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यांचे सर्वात स्वस्त तिकीट १००० पाकिस्तानी रुपये आहे, जे भारतात ३१० रुपयांच्या समतुल्य असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी अंतर्गत, पाकिस्तानमधील सर्व सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होतील. तर पाकिस्तान-बांगलादेश सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट २००० पाकिस्तानी रुपये (सुमारे ६२० भारतीय रुपये) आहे. हा सामना रावळपिंडी येथे होणार आहे.