---Advertisement---
Bharat Ratna for RSS Dr. Hedgewar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केसव बळीराम हेडगेवार हे भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ देण्यात यावा, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी केली आहे. त्यांनी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. या पत्रामध्ये त्यांनी डॉ. हेगडेवार हे भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक होते, असे नमूद केले आहे.
पत्रात जमाल सिद्दीकी म्हणले की, राष्ट्र निर्मिती त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. राष्ट्र निर्माण मध्ये त्यांची मोठी भूमिका असल्याने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन तरुण पिढीसाठी एक नवी प्रेरणा निर्माण करावी, अशी मागणी जमाल सिद्धीकी यांनी त्यांच्या पत्राद्वारे केली आहे.
संघामध्ये कधीच जातीभेद पाळले जात नाही. त्यामुळे एका मुस्लिम स्वयंसेवकाने डॉक्टर हेडगेवार यांच्यासाठी भारतरत्नाची मागणी करणे यात काहीही गैर नसल्याचे जमाल सिद्दिकी म्हणाले.
दरम्यान, नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने स्मारक टपाल तिकीट आणि विशेष नाणं प्रकाशित करण्यात आले आहे.
---Advertisement---