भारत-अमेरिकेत १० वर्ष्यांच्या संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या

---Advertisement---

 

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन येथे शुक्रवारी १० वर्षाचा संरक्षण करार झाला असून भारताचे संक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे दोन्ही देशात लष्करी सराव, प्रशिक्षणासाठी सैन्याला मदत आणि सुरक्षासंदर्भातील गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सांगितले, की माझी भारताच्या संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक झाली. संरक्षणविषयक अनेक मुद्यांवर चर्चा केल्यानंतर आम्ही सरक्षण करारावर स्वाक्षरी केली. भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण करारामुळे प्रादेशिक स्थिरता मजबूत होईल. माहितीची देवाणघेवाण आणि तांत्रिक सहकार्य, एकत्र लष्करी सराव करणे यासारखे मुद्यांचा करारात समावेश आहे. त्याचवेळी राजनाथ सिंह म्हणाले, दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये संरक्षण हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

संरक्षण आराखडा करारावर स्वाक्षरी झाल्याने नवीन अध्याय सुरू होईल. करार भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण भागीदारीच्या धोरणांना मार्गदर्शन करेल. संरक्षण हा आमच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. मु. नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी आमची भागीदारी महत्त्वाची आहे. हा करार दोन्ही देशांमधील वाढत्या धोरणात्मक सहकार्याचा केंद्रबिंदू आहे.

ऐतिहासिक संरक्षण करार

भारत-अमेरिका संरक्षण संबंधांना धोरणात्मक दिशा प्रदान करेल. हे आमच्या वाढत्या धोरणात्मक एकत्र येण्याचे संकेत आहेत आणि भागीदारीच्या नवीन दशकाची सुरुवात ठरेल. संरक्षण करार आमच्या द्विपक्षीय संबंधांचा एक प्रमुख आधारस्तंभम्हणून राहील.
राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

करारातील प्रमुख मुद्दे

  • दोन्ही देश संरक्षण आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करतील.
  • संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षमता विकास क्षेत्रात सहकार्य वाढवले जाईल.
  • हिंद प्रशांत महासागरात लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सुरक्षा उपक्रम राबवले जातील.
  • क्षेत्रीय स्थैर्य राखण्यासाठी संरक्षण धोरणांमध्ये समन्वय साधला जाईल.
  • करारामुळे अमेरिकेला चिनविरोधी रणनितीक संतुलन साधता येईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---