तरुण लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२२ । भारत आणि बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १० डिसेंबरला चितगाव येथे जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघ अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहे.तर या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला असून भारताचा धाकड गोलंदाज कुलदीप यादवचा टीम इंडियाच्या संघात समावेश केला आहे.
टीम इंडिया सध्या अनेक खेळाडूंच्या दुखापतीशी झुंजत आहे, त्यामुळे बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. टी-२० विश्वचषक २०२२ पूर्वी कुलदीप यादवने टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्या मालिकेत कुलदीप यादवने चांगली कामगिरी केली होती.
तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.